चाळीसगाव नगरपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर पराभूत अपक्ष उमेदवार राकेश बोरसे यांच्या घरावर अज्ञातांनी दगडफेक केली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.