भर उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिथे अनेक नद्या-नाले कोरडे पडलेले पाहायला मिळत आहेत, तिथे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातून वाहणारी गिरणा नदी मात्र दुथडी भरून वाहताना दिसत आहे. यामागचं कारण म्हणजे गिरणा धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी चौथे आवर्तन सोडण्यात आलं असून सध्या सुमारे 2 हजार क्यूसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या पाण्यामुळे एरंडोल, धरणगाव, पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव या तालुक्यांना मोठा दिलासा मिळणार असून पाणीटंचाईच्या झळा बसत असताना हा विसर्ग नागरिकांसाठी महत्त्वाचा ठरत आहे.