कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात पुन्हा एकदा हत्तीच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पाटणे फॉरेस्ट रेंजमध्ये ‘अण्णा’ नावाचा हत्ती आढळून आला असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. सध्या आण्णा नावाचा हत्ती पार्ले भागात असल्याची माहिती असून, वन विभागाकडून हत्तीवर सातत्याने नजर ठेवली जात आहे.आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या शेतीच्या नुकसानीची नोंद झालेली नाही मात्र जंगलालगत असलेल्या गावांतील शेतकरी व नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन पाटणे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी केलं आहे...