वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या चंद्रभागा नदीत मोठ्या प्रमाणात घाण आणि कचरा साचला आहे. कपडे, कचऱ्याचे ढिगारे आणि वाळू उपशामुळे नदीपात्रात खड्डे पडले आहेत. यामुळे पाण्याला दुर्गंधी सुटली असून ते दूषित झाले आहे. लाखो भाविकांना याच अस्वच्छ पाण्यात स्नान करावे लागत असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.