शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात त्यांनी म्हटलं की, "महाविकास आघाडी म्हणून आम्ही नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं जाणार आणि मुंबईत उद्धव ठाकरे हेच शक्तीशाली आहेत." यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, "पवारांना अलिकडच्या काळात त्यांच्यापेक्षा आणखी पॉवरफुल कोणीतरी आहे असं म्हणावं लागतंय. त्यांच्यापेक्षा वयाने लहान माणसाला मोठं बोलावं लागतं हा त्यांचा मोठेपणा आहे."