चंद्रपुरात हिंदू नववर्ष गुढीपाडवा सणाचे उत्साही स्वागत करण्यात आले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात यानिमित्ताने धार्मिक प्रमुखांच्या उपस्थितीत 21 फूट उंच गुढी उभारण्यात आली. महापौर संगीता खांडेकर चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते गुढीचे विधिवत पूजन करून सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.