वाढत्या तापमानासह चविष्ट ताडफळांनी बाजार गजबजला आहे. चंद्रपुरात पारा उच्चांकी पोचला आहे. मध्य एप्रिलमध्ये चंद्रपूरचे तापमान 41 अंश सेल्सिअसकडे वाटचाल करत आहे. केवळ अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडणारे नागरिक अंग झाकून, डोके कापडाने बांधून घेत कामे करत आहेत. सोबतच शरीर थंड ठेवणारी फळे सेवन करण्याकडे नागरिकांचा कल आहे.