चंद्रपूर जिल्ह्यातील धाबा ग्रामपंचायतेने जिल्हा परीषद शाळा धाबा येथे 85 हजाराचा वॉटर कुलर जानेवारी 2025 दिला होता. प्रत्यक्षात हा वॉटर कुलर शाळेत लागलाच नाही.शाळेत शिकणाऱ्या शेकडो मुलांना शाळेजवळ असलेल्या एका खाजगी विहिरीच्या पाण्याने तहान भागवावी लागत आहे.हा धक्कादायक प्रकार जिल्हातील पहिली मुलींची शाळा असलेल्या शाळेत घडला आहे. विशेष म्हणजे पंधरा दिवसापूर्वी नळातील पाण्यात जंतू आढळले होते. पालकांनी शाळेतील मुख्याध्यापकाना जाब विचारला होता.