चंद्रपूरकरांच्या पसंतीचे आणि स्वादिष्ट समोसा- जिलेबी नाष्टा सेवा देणारे मामा जलेबीवाला दुकान बंद होण्याच्या मार्गावर आहे. सिलिंडरच्या तुटवड्याने या प्रसिद्ध व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे. सध्या व्यावसायिक सिलिंडर उपलब्धता होत नसल्याने कोळसा भट्टी वापरून हा व्यवसाय कसाबसा सुरू आहे. नाश्त्याची प्रति प्लेट किंमत देखील 5 रुपयांनी वाढविण्यात आली आहे.