चंद्रपूर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर हा तस्करीच्या फेऱ्यात अडकला आहे. शहरातील wcl परिसरातील माना टेकडी जवळ इरई नदी काठावर तस्करांनी मोर पकडण्यासाठी नदीत एक किलोमीटर लांब जाळे लावले. होते. सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीवरून वन विभागाने जाळे जप्त केले, मात्र आता प्रश्न उपस्थित होतोय – राष्ट्रीय पक्ष्याची जबाबदारी कोणाची?सामाजिक कार्यकर्ते अनुप चिवंडे आणि पक्षीप्रेमी मनोज बंडेवार यांनी ही बाब लक्षात येताच वन विभागाला कळवले. तात्काळ कारवाई करत वन कर्मचाऱ्यांनी जाळं जप्त केलं. मोरांप्रती वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी करण्यात आली आहे.