राज्य सरकारने दारू वरील व्हॅट करात भरमसाठ वाढ केली आहे. यामुळे हॉटेल व बार उद्योगावरील आर्थिक भार वाढला आहे. परवाना शुल्कातही 65% आणि उत्पादन शुल्कात 60 % वाढ करण्यात आली असल्याने रेस्टॉरंट आणि बार व्यवसाय डबघाईस येण्याची शक्यता आहे. हा करांचा भार कमी करण्यात यावा यासाठी आज संघटनेने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. राज्यातील सर्व हॉटेल-परमिट रूम-बार बंद ठेवण्यात आले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील व्यापारी या राज्यव्यापी आंदोलनात सहभागी होणार असून सुमारे 650 हून अधिक बार -परमिट रूम बंद आहेत. तसेच सरकारच्या विरोधात रेस्टॉरंट आणि बार असोसिएशनने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.