बुद्ध पौर्णिमेला म्हणजेच एक मे रोजी मचाणवरून प्राणीगणना केली जाणार आहे. याला निसर्गानुभव असे नाव देण्यात आले असून, रात्रभर मचाणवर बसून हौशी आणि अनुभवी प्रगणकांना प्राण्यांची गणना करायची आहे. यासाठी ताडोबाच्या बफर क्षेत्रातील 57 लोखंडी मचाण सिद्ध करण्यात आल्या असून, एका मचाणावर दोन प्रगणक बसू शकतील. तर कोअर म्हणजे गाभा क्षेत्रात वन विभागाचे कर्मचारी आणि अधिकारीवर्ग प्राणीगणना करणार आहे. ज्या 57 मचाण वन्यप्रेमींसाठी आरक्षित आहेत, त्याची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने आधीच झाली असून, त्यासाठी साडेतीन हजार रुपये शुल्क आकारण्यात आले आहे.