आदिवासी प्रवर्गात अन्य जातींची घुसखोरी करण्यासंदर्भात राज्यात वेगवेगळी विधाने केली जात आहे. या विरोधात राज्यभरातील आदिवासींनी आता रस्त्यावर उतरून एल्गार पुकारल्याचे चित्र दिसत आहे. बंजारा आणि धनगर या समाज घटकांचा एसटी प्रवर्गातील संभाव्य समावेश पाहाता आदिवासींनी राज्यभरात विविध ठिकाणी मोर्चाची मालिका आरंभली आहे. चंद्रपुरात आज ऐतिहासिक कोहिनूर तलावातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत घुसखोरी विरोधी भव्य मोर्चा काढला.