चंद्रशेखर बावनकुळे यांनी दावा केला आहे की, महायुतीच्या माध्यमातून मुंबईत भाजपचा महापौर बसेल. देवेंद्र फडणवीस यांनी २०२९, २०३५ आणि २०४७ साठी मुंबई विकासाचा आराखडा तयार केला आहे. जनतेला विकास हवा असल्याने महायुतीला ५१ टक्क्यांहून अधिक मते मिळतील, असा विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केला.