चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊतांच्या सततच्या टोमण्यांवर टीका केली. मुंबई महाराष्ट्राची आहे आणि हे सत्य चंद्र-सूर्य असेपर्यंत कायम राहील, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज्यातील जनतेलाही हेच वाटते. राऊतांचे हे कृत्य केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी असल्याचे बावनकुळे म्हणाले.