चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसमधील सद्यस्थितीवर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, काँग्रेसमध्ये अंतर्गत विसंवादामुळे कार्यकर्ते आणि नेते हतबल झाले आहेत, त्यांना योग्य दिशा मिळत नाहीये. भाजपमध्ये येणाऱ्यांचे स्वागत केले जाईल असेही त्यांनी नमूद केले, प्रज्ञा सातव यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाबाबतही त्यांनी अप्रत्यक्षपणे संकेत दिले.