चांदवड तालुक्यातील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या राजदेरवाडी येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. एल निनोच्या प्रभावामुळे अद्यापही मान्सूनच्या पावसाने हजेरी न लावल्यामुळे विहिरींनी तळ गाठले आहेत. इंद्रायणीवाडी येथे अद्यापही शासनाकडून टँकर सुरू झाले नसल्याने हंडाभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे.