कोल्हापूर शहरातील हॉटेलच्या दरवाढीवरील मुद्द्यावरून कुरुंदवाड येथे बैठकीत गोंधळ निर्माण झाला आहे. या वादाला सुरुवात होताच मुख्याधिकाऱ्यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. चार दिवसापूर्वी कुरुंदवाडमधील एका हॉटेलमध्ये सार्वजनिक शौचालयातील पाणी वापरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या गंभीर प्रकरणानंतर आज मुख्याधिकाऱ्यांनी शहरातील हॉटेल व्यवसायिकांची बैठक बोलावली होती. हॉटेलमधील स्वच्छतेनंतर दरवाढीच्या मुद्द्याला सुरुवात होताच बैठकीत गोंधळ निर्माण झाला.