चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यातील तलावात रात्रीच्या वेळी पाण्याच्या आतून येणारा तो गूढ पिवळा प्रकाश नेमका कशाचा होता? दैवी चमत्कार की कोणती अंधश्रद्धा? जवराबोडी मेंढा अंतर्गत रुपाळा मेंढा येथील तलावात गेल्या तीन दिवसांपासून दर मिनिटाला एक पिवळसर प्रकाश लुकलुकताना दिसत होता. हा प्रकार पाहायला आसपासच्या ५-६ गावांतील नागरिकांनी रात्रीच्या वेळी प्रचंड गर्दी केली होती.