पावसाळ्याची वर्दी देणारा निसर्गाचा दूत म्हणून ओळखला जाणारा 'चातक' पक्षी यंदा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत विक्रमी वेळेत कृष्णाकाठी दाखल झाला आहे. दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात आफ्रिकेतून हजारो किलोमीटरचा प्रवास करून येणारा हा पाहुणा यंदा चक्क एप्रिल महिन्यातच मुक्कामी आला आहे.