इचलकरंजी शहरात ज्येष्ठ अमावस्येनिमित्त श्री चौंडेश्वरी देवीचा वार्षिक उत्सव पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या भक्तिभावात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. मंगळवार पेठेतील श्री चौंडेश्वरी मंदिर तसेच गावभागातील श्री बनशंकरी मंदिर विद्युत रोषणाई व आकर्षक फुलसजावटीने उजळून निघाले होते. दोन्ही मंदिरांमध्ये देवीच्या दर्शनासाठी भाविकांची दिवसभर मोठी गर्दी उसळली होती.