माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांनी चेंबूर, वार्ड 142 मध्ये मतदारांना साड्या वाटल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. निवडणुका जाहीर होऊनही साडी वाटप केल्याचा आरोप ठाकरे सेनेने केला आहे. स्थानिकांनी याला विरोध करत वाटलेल्या साड्या जाळल्या. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.