चेंबूर प्रभाग क्रमांक 153 मधील व्हिलेज मुंबई पब्लिक हायस्कूल येथील मतदान केंद्रावर बोगस आयडी कार्ड वापरून काही व्यक्तींनी प्रवेश केल्याची घटना घडली आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी अशा लोकांना पकडून गोवंडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या प्रकरणात रवींद्र महाडिक आणि लक्ष्मण पांढरे यांचाही सहभाग असल्याचा दावा करण्यात आला असून त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.