अहिल्यानगर शहरात छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा प्रोफेसर चौकात दाखल झाला. महाराजांच्या स्वागतासाठी संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. फटाक्यांच्या आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले. आमदार संग्राम जगताप उपस्थित होते. महाराजांच्या शौर्याला अभिवादन करत हा पुतळा शहरासाठी प्रेरणास्थान ठरणार असून, अहिल्यानगरच्या इतिहासात सुवर्णपान जोडणारा ठरला आहे.