छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती बुलढाणा शहरात मोठ्या उत्साहात आणि भव्य दिव्य स्वरूपात साजरी केली जाते, आमदार संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून गेल्या अनेक वर्षांपासून विविध कार्यक्रमाचे आयोजन या जयंतीच्या निमित्ताने केले जाते. बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा आणि स्मारक उभारण्यात आलं आहे, याच स्मारकासमोर छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करून रात्री बारा वाजता जल्लोष करत फटाक्यांची मोठी आतिषबाजी करण्यात आली.