जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या अजिंठा लेणीच्या संवर्धन व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हजारो वर्षांपूर्वी कलाकारांनी दगडात साकारलेला हा कलावैभवाचा ठेवा सध्या पावसाच्या पाण्याच्या गळतीमुळे धोक्यात आला आहे.