छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद आणि जगप्रसिद्ध वेरूळ लेणी परिसरात मंगळवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. या दमदार पावसामुळे जागतिक वारसा स्थळ असलेल्या लेणीतील निसर्ग सौंदर्य बहरले असून येथील प्रसिद्ध धबधबे प्रवाहीत झाले आहेत.