छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. मुरमा गावात पाणी नसल्याने मोसंबीच्या बागा सुकू लागल्या आहेत.त्यामुळे काही शेतकऱ्यांना स्वतःच्या बागांवर कुऱ्हाड चालवावी लागत आहे. यात लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.