छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या उमेदवाराच्या प्रचार रॅलीतील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एमआयएम समर्थकांकडून नोटांची उधळण करण्यात येत असल्याचे दिसत आहे. या घटनेमुळे निवडणुकीच्या आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा आरोप होत असून, हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय बनला आहे.