छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने केली. उमेदवारी न मिळाल्याने काही महिला पदाधिकाऱ्यांनी उपोषण सुरू केले असून, त्यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या गाडीला घेराव घातला. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत जमावाला पांगवले.