छत्रपती संभाजीनगर येथे भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) महिला कार्यकर्ती दिव्या उल्हास मराठी यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत तिकीट नाकारल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. १८ वर्षांपासून पक्षात काम करणाऱ्या मराठी यांनी ओपन महिला प्रवर्गातून प्रभाग क्रमांक २० साठी तिकीट मागितले होते, मात्र ते एका नवीन कार्यकर्त्याच्या पत्नीला देण्यात आले. या विरोधात त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.