अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरी प्रकरणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र काँग्रेसने राज्यभर छेडलेल्या "रघुपती राघव राजाराम सत्याग्रह" आंदोलनाचा भाग म्हणून आज छत्रपती संभाजीनगर शहरात काँग्रेसने आंदोलन केले. गुलमंडी येथील दक्षिण मारुती मंदिरापासून कुंभारवाड्यातील अमृतेश्वर राम मंदिरापर्यंत पदयात्रा काढत काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.