छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अंभई गावात दोन गटांमध्ये झालेल्या तुफान राड्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. पोलिसांनी दोन्ही गटांतील अनेक जणांना ताब्यात घेतले आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आज अंभई गावात संचारबंदी लागू करण्यात आली होती.