छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौक परिसरात मुलींचे फोटो काढल्याच्या कारणावरून दोन गटात मोठी मारामारी झाली. या घटनेत सुमारे 35 ते 40 मुलांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. मुलींच्या वडिलांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.