कन्नड सोयगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरात पाणी शिरले असून, शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शेतीची जमीन वाहून गेली आहे. रात्रीच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांना मोठी हानी सहन करावी लागली आहे. सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे.