मनोज जरांगे पाटील यांनी राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरातून भव्य अभिवादन रॅली काढली. क्रांती चौकात राजमाता जिजाऊंना वंदन करून सुरू झालेली ही रॅली केंब्रिज चौकापर्यंत पोहोचली. यावेळी पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनाही अभिवादन केले. या रॅलीने शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.