छत्रपती संभाजीनगर शहरातील शिवाजीनगर भुयारी मार्ग हा सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे. आधी या भुयारी मार्गात पहिल्याच पावसात पाणी साचल्यामुळे पूर्णपणे वाहतूक ठप्प झाली.त्यानंतर पालिकेने हा रस्ता बंद ठेवत त्यावर पत्र्याचे शेड बसवले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ त्या ठिकाणी साचली.त्यात पाऊस पडला की पाणी खाली येऊन ते रस्ते संपूर्ण चिखलमय होतात. रहदारी करणारी वाहने याठिकाणी घसरू लागली असल्यामुळे हा भुयारी मार्ग आता घसरगुंडी बनला आहे.