छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. सत्ताधारी महायुतीतील हे दोन्ही प्रमुख पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार भाजपच्या उमेदवाराविरोधात सक्रिय प्रचार करत आहेत, ज्यामुळे सिल्लोडमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळत आहे.