खुलताबाद तालुक्यातील खांडी पिंपळगावात सार्वजनिक स्मशानभूमी नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी मृत तरुणाच्या अंत्यसंस्कारासाठी थेट ग्रामपंचायतीसमोरच सरण रचले. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाल्याने तहसील, पंचायत समिती, पोलिस प्रशासनाची एकच धावपळ उडाली.