सांगली आणि मिरज मध्ये चिकनच्या दराने आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडले आहे. वाढत्या उन्हामुळे पक्षी उत्पादनात घट होत आहे. उत्पादनामध्ये मोठी घट झाल्यामुळे याचा परिणाम पोल्ट्री व्यवसाय आणि चिकन दुकानात जाणवत आहे. साधारणता 45 दिवसांमध्ये होणाऱ्या पक्षी आता 60 दिवसाचा कालावधी घेत आहे. त्यात उन्हाच्या तीर्वतेमुळे पक्ष्यांचे प्रमाण हे कमी झाले आहे. त्यामुळे पक्षांचे जाळे हे मोकळे दिसू लागले आहेत. चिकन मार्केटमध्ये तुटवडा जाणवू लागला आहे. पक्षी नसल्यामुळे ग्राहकांना चिकन देणेही अवघड झाले आहे. चिकन हे 280 ते 300 रुपयांनी विकले जात आहे.