यवतमाळ जिल्ह्यात रब्बी हरभरा पिकावर शेंडे, पाने आणि फुले खाणाऱ्या अळीचा तीव्र प्रादुर्भाव झाला आहे. वाढीच्या अवस्थेत असलेली हरभऱ्याची जोमदार पिके या अळीमुळे फस्त होत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना पिकाचे संरक्षण करण्यासाठी महागड्या फवारण्या कराव्या लागत असून, त्याचा मोठा आर्थिक फटका त्यांना सहन करावा लागत आहे. ही किड शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनली आहे.