मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी कोलकात्याच्या कालीघाट मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. पश्चिम बंगालच्या लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी प्रार्थना केली. पश्चिम बंगाल राज्यात मुक्त, निष्पक्ष आणि उत्सवपूर्ण निवडणुका होतील असा विश्वास देखली त्यांनी व्यक्त केला. आज आणि उद्या केंद्रीय निवडणुक आयोगाची टीम पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी बंगालमध्ये आहे.