मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. जन्मदिवसाच्या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होऊन दर्शन घेण्याची संधी मिळणे भाग्याचा क्षण आहे. सगळे वारकरी म्हणजे माऊलींचे रूप आहे. त्याचं सानिध्य मिळणे यामुळे मी खूप आनंदी आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.