अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे जगातील सर्वात लांब (407 मीटर) काचेचा स्कायवॉक तयार होत आहे. स्वित्झर्लंड व चीनमधील स्कायवॉकच्या तुलनेत हा भारतातील पहिलाच स्कायवॉक पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. या प्रकल्पामुळे चिखलदरा येथील पर्यटन वाढणार असून, स्थानिक आदिवासींना रोजगाराची नवी साधने उपलब्ध होतील. लवकरच हा स्कायवॉक पर्यटकांसाठी खुला होईल.