जगात युद्धाचे सावट असले तरी भारतात चिमुकल्यांचा एकमेकांवर फुग्यांचा मारा करत धुळवड साजरा होताना पाहायला मिळत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये आज सकाळ पासूनच चिमुकल्यांनी एकमेकांवर पाण्याच्या फुग्यांचा वर्षाव करत आपल्या धुळवडीची सुरुवात केल्याच पाहायला मिळाले या चिमुकल्यांनी रात्रीच धुळवडीची तयारी करत पाण्याचे फुगे भरून ठेवून सकाळीच धुळवडीला सुरुवात केली.