युनेस्कोने 'मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया' या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली. त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान असलेला शिवनेरी या किल्ल्याचा देखील समावेश आहे. दिवाळीनिमित्त मनमाडच्या बालकलाकारांनी किल्ले शिवनेरीची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे.