आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाच्या झळा आता थेट स्वयंपाकघरापर्यंत पोहोचल्या आहेत. खाद्यतेलाच्या दरवाढीमुळे मिरची पावडर उत्पादनही महागले असून, सामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. मिरची पावडर तयार करण्यासाठी लागणारे रिफाइंड ऑईल आणि पॅकिंग साहित्य महागल्याने उद्योगांवर आर्थिक ताण वाढला आहे. नंदुरबारमध्ये मिरची पावडर तयार करणाऱ्या सुमारे ४० कारखान्यांना कच्च्या मालाचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी, उत्पादन खर्च वाढल्याने मिरचीचे दरही झपाट्याने वाढत आहेत. यंदा हंगामात उत्पादन कमी झाल्यामुळे मिरचीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.