पालघर जिल्ह्यातील चिंचणी समुद्रकिनारी नवी मुंबईतून आलेल्या तीन पर्यटकांचा उत्साह अंगलट आला. भरतीच्या पाण्यात त्यांची Ertiga कार समुद्रात अडकली. अतिउत्साहामुळे समुद्राच्या धोकादायक लाटांमध्ये गाडी फसली. स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने अखेर ही गाडी बाहेर काढण्यात यश आले. अशा घटनांमधून पर्यटकांनी समुद्राजवळ गाडी चालवताना सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे.