चिपळूणच्या वालोपे गणेशवाडी येथे वाशिष्ठी नदीत मगरीचा थरार पहायला मिळाला. कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या नंदिनी पवार यांच्यावर मगरीने हल्ला केला. मगरीने नंदिनी पवार यांचा पाय पकडून त्यांना पाण्यात ओढण्याचा प्रयत्न केला. आई संकटात सापडल्याचे पाहताच त्यांची 10 वर्षांची मुलगी स्वर्णी धावत आईजवळ पोहोचली. स्वर्णीच्या प्रसंगावधानामुळे नंदिनी पवार यांची मगरीच्या तावडीतून सुटका झाली.