कोकणात मोठ्या उत्साहात शिमगा उत्सव सुरू झाला आहे. शिवसेना नेते आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी दरवर्षीप्रमाणे त्यांच्या चिपळूण तालुक्यातील तुरंबव या गावी भेट दिली.यावेळी ग्रामस्थांसमवेत त्यांनी ग्रामदेवता श्री शारदादेवीची पालखी खांद्यावर घेऊन नाचवली.ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी त्यांचे चिरंजीव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य विक्रांत जाधव, माजी नगरसेवक समीर जाधव, योगेश जाधव, सिद्धेश जाधव, सुहास जाधव हे देखील सहभागी झाले होते.